डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी डझनवेळा सेक्स केल्याचा प्लेबॉय मॉडेलचा खुलासा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी डझनवेळा सेक्स केल्याचा प्लेबॉय मॉडेलचा खुलासा डोनाल्ड ट्रम्पनी प्रेमाची कबुली दिली होती - कारेन मॅकडोगल Garma Garam | Updated: March 23, 2018 3:20 PM प्लेबॉय मासिकाची मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या कारेन मॅकडोगलने तिचं अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अफेअर होतं आणि त्यांनी किमान डझनवेळा सेक्स केलं होतं असा दावा केला आहे. ट्रम्प यांच्याशी 2006 मध्ये आपलं प्रेमप्रकरण सुरू झाल्याचं ती म्हणाली. ट्रम्प यांनीही प्रमेची अनेकवेळा कबुली दिल्याचं तिनं म्हटलंय. या अफेअरचा शेवट लग्नात होईल अशी अपेक्षा होती का यावर तिनं शक्य होतं, असं उत्तर दिलं. तर, रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार व्हाइट हाऊसनं डोनाल्ड ट्रम्प यांनी या मॅकडोगलबरोबर अफेअर असल्याच्या आरोपाचा इन्कार केल्याचं स्पष्ट केलं आहे. मॅकडोगलच्या या बहुचर्चित अफेअरबद्दली तिनं दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. न्यू यॉर्कर या मॅगेझिननं फेब्रुवारी महिन्यात वृत्त दिलं होतं की, ट्रम्प यांचं मॅकडोगल यांच्याशी अफेअर होतं, त्याचवेळी त्यांचे एका पॉर्नस्टारशीही अनैतिक संबंध होते. ट्रम्प यांच्यावर ...